
थंडीच्या मोसमात प्रत्येकाला गरमा-गरम आणि तळलेले पदार्थ खाणे प्रचंड आवडते. मात्र, यामुळे आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर हानिकारक परिणाम होतो. हिवाळ्याच्या काळात आपली त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव होते. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या हंगामात आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. हे आपण जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यात आवळ्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आवळा एक असा सुपरफूड आहे जो हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूत खाऊ शकतो. हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस प्यायल्यास त्यातील पोषक तत्वांमुळे त्वचा निरोगी राहते.

हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे देखील खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे या ऋतूमध्ये त्वचेला अनेक संक्रमणांपासून संरक्षण मिळते. दिवसातून एक ग्लास तरी हळदीचे दूध पिले पाहिजे.

तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीन टी हे नेहमीच फायदेशीर पेय आहे. याचे सेवन केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्याचे काम करतात.

पुदिना चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे आपले मूड सुधारण्यासाठी कार्य करते. हा चहा तयार करण्यासाठी पुदिन्याच्या झाडाची पाने गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे ठेवा त्यानंतर हे पाणी प्या.