
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे घामाचा वासही कमी होतो. दिवसा दुपारी दही किंवा ताक सेवन करा. कारण उन्हाळ्यात दह्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात अशी फळे मिळतील, ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. तज्ज्ञांच्या मते शरीर हायड्रेटेड राहिल्यास घामाचा वास कमी होतो. त्यामुळे कलिंगड, खरबूज आणि काकडीचे अधिक सेवन करा. यामुळे हायड्रेटेड राहण्यास नक्की मदत होईल.

जर आपली पचनसंस्था निरोगी राहिली तर शरीराचे तापमानही याद्वारे नियंत्रित राहते. त्यामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाचा वास अजिबात येणार नाही. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्सने पचनसंस्था निरोगी ठेवता येते.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच त्यातील फायबरचे प्रमाण पूर्ण करणे देखील महत्त्वाचे आहे. फायबरच्या कमतरतेमुळे शरीराला पचनासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तापमान वाढल्याने घामही येतो. त्यामुळे काकडी किंवा इतर फायबर युक्त गोष्टींचे सेवन नक्कीच करा.

आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी पाणी हा रामबाण उपाय म्हणून काम करते. ज्या लोकांना घामाला दुर्गंधी येण्याची समस्या आहे, त्यांनी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाण्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.