
वजन कमी करण्यासाठी केवळ शारीरिक हालचालीच नव्हे तर योग्य आहार देखील आवश्यक आहे. नियमित व्यायामासोबतच तुम्हाला योग्य आहार घ्यावा लागणार आहे.

निरोगी शरीरासाठी योग्य आहार आवश्यक आहे. पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ खाऊन तुम्ही वाढलेले वजन कमी करू शकता.

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार घ्या. यामुळे चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत मिळते.

ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् युक्त आहार घ्या. मासे, शेंगदाणे आणि हिरव्या भाज्यांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड भरपूर असते.

शरीराची ताकद वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)