
कुरडई... प्रत्येकाला आवडणारा मराठमोळा पदार्थ... सणासुदीला तर अगदी आवडीने कुरडई खालली जाते. मात्र ही कुरडई बनवायला बराच वेळ लागतो आणि मेहनतही फार लागते.

मात्र खायला कुरकुरीत आणि एका दिवसात बनणारी कुरडईची रेसिपी तुम्हाला माहितीये का? दररोजच्या वापरातील पोह्यापासून तुम्ही कुरडई बनवू शकता. यासाठी तुम्हाला गहू भिजवण्याची वगैरे अजिबातच गरज नाही.

कांदे पोहेसाठी वापरतो ते पोहे घ्या. पोहे एका भांड्यात घेऊन त्यात पाणी टाका थोडावेळ ते पोहे भिजू द्या 15 मिनिटानंतर हे भिजलेले पोहे चाळणीवर घ्या.

पुरण बारीक करतो, तसं भिजवलेले पोहे या चाळीवर बारीक करून घ्या. मग त्यात चवीप्रमाणे मीठ टाका हवं असेल तर जीरापूडही तुम्ही टाकू शकता. मग साचाने कुरडई टाका... उन्हात किंवा फॅनखाली देखील ही कुरडई एका दिवसात वाळते.

नंतर दुसऱ्या दिवशी ही कुरडई तेलात तळू शकता. कुरडईमुळे साध्या जेवणाला देखील लज्जत येते. सणासुदीच्या जेवणात तर कुरडई लागतेच लागते. त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला जरूर कळवा.