
कांदा ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे कांदा हा आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. केस वाढण्यापासून ते केस तुटणे कमी करण्यापर्यंत कांदा तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कांद्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करते. यामुळे तुमची टाळू निरोगी राहते. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.

इतकेच नाहीतर कांदा टाळूला निरोगी आणि संसर्गापासून मुक्त ठेवण्यास मदत करतो. कांद्याचे तेल आणि कांद्यापासून बनवलेला हेअर मास्कही वापरू शकता. तुम्ही कांद्याचा रस, मध, एरंडेल तेल आणि अंडी इत्यादी वापरून कांद्यापासून हेअर मास्क देखील बनवू शकता.

हेअर मास्कसाठी 2 चमचे कांद्याचा रस घ्या. 1 चमचा मध घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुमच्या टाळूवर लावा आणि हलक्या हाताने काही मिनिटे मालिश करा. हे मिश्रण अर्धा तास तसंच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. आपण आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता. यामुळे आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

प्रथम एक कांदा घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. आता चिरलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पेस्ट बनवा. पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामधून रस काढून घ्या. एका भांड्यात 3 चमचे कांद्याचा रस टाका. नंतर 2 चमचे एरंडेल तेल घाला आणि दोन्ही साहित्य चांगले मिसळा. त्यानंतर हे आपल्या केसांना आणि टाळूला वीस मिनिटे राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

1 चमचा कांद्याचा रस घ्या. 1 अंडे घ्या. नंतर दोन्ही साहित्य एका भांड्यात ठेवा आणि मिश्रण तयार करण्यासाठी फेटून घ्या. मिश्रणात रोझमेरी किंवा लैव्हेंडर तेलाचे 2-3 थेंब घाला. हे मिश्रण तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा. 40 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. या पॅकमुळे आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.