
जास्त शाम्पू करणे : कलर केलेल्या केसांना (color hair)शाम्पू व साबण लावू नये. जर आपण या केसांना जास्त साबण किंवा शाम्पू लावल्यास केसांना लावलेला कलर फिका (doul color) पडतो. असे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून जास्त शाम्पू वापरू नये. जर तुम्हाला केसांना शाम्पू लावायचा असेल तर थेट शाम्पू केसांवर लावू नये त्या शाम्पू मध्ये थोडेसे पाणी(water) मिक्स करून लावा.

केसांच्या समस्या

रिपेयरिंग हेअर मास्क: बहुतेक वेळा वेगवेगळे कलर व केसांची टिटमेंट केल्यामुळे केसांचे आरोग्य खराब होते, परिणामी केस गळणे, केस तुटणे ,अकाली पांढरे पण येणे यासारख्या समस्या सतावत असतात. कलर केलेल्या केसांची निगा राखायची असल्यास रिपेयरिंग हेअर मास्कचा अवश्य वापर करा. रिपेयरिंग हेअर मास्क बनण्यासाठी कोरफड, गुलाबजल आणि व्हिटॅमिन ई तेलाचा वापर करा. या पदार्थांचा वापर केल्याने तुमचे केसांचे आरोग्य चांगले राहते.आपले केस नैसर्गिक रित्या मजबूत व चमकू लागतात.

केसांची उत्तम निगा राखण्यासाठी काही टीप्स

सल्फेट फ्री प्रोडक्ट्सचा वापर : जे केसांना कलर केलेला आहे अशा केसांना सल्फेट असलेले प्रॉडक्ट अजिबात वापरू नका. जर तुम्हाला तुमच्या केसांची निगा राखायची असेल तर ज्या प्रोडक्ट्समध्ये सल्फरचे प्रमाण खूपच कमी आहे किंवा अजिबातच नाही अशा प्रकारचे प्रोडक्ट्सच केसांवर लावा.