
तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मुरुमाचा त्रास होतो. मुरुमाची समस्या असलेल्या लोकांना त्वचेची अधिक काळजी ही घ्यावी लागते. त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले तर आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

ऍस्पिरिन पावडर आणि पाणी घालून पातळ पेस्ट बनवा. ती पेस्ट रात्री लावा आणि झोपी जा. सकाळी उठून आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.

काकडी त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे ए, डी आणि ई असतात. जे मुरुमांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत. काकडीची बारीक पेस्ट करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.

नेहमीच लक्षात ठेवा की, फेसपॅक करतांना त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत. लिंबू आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असते.

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. ग्रीन टीची बॅग गरम करून त्वचेवर 20 मिनिटे ठेवा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.