
पिकलेल्या केळ्याला मॅश करून त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाका. नंतर हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. केळीमध्ये पोटॅशियमसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये निरोगी चरबी आणि व्हिटॅमिन ई असते.

पिकलेला एवोकॅडो मॅश करा आणि त्यात नारळाचे दूध आणि एक चमचा ऑलिव्ह तेल घाला. हा मास्क केसांना लावा. हा मास्क 20 ते 30 मिनिटे राहू द्या.

दोन चमचे तेलामध्ये तुम्ही नारळ तेल, ऑलिव्ह तेल मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा. 20 मिनिटांनंतर शॅम्पूने धुवा. हे कोरड्या केसांना आर्द्रता दूर करण्यास मदत करते.

सांकेतिक छायाचित्र

चार चमचे एलोवेरा जेल घ्या आणि त्यात तीन मोठे चमचे दही मिक्स करा. हा पॅक केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा. ते धुण्यापूर्वी अर्धा तास सोडा. यामुळे कोरडे केस मऊ होण्यास मदत होईल.(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)