Skin Care Tips | चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहा!
त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोमॅटो वापरा. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडेंट लाइकोपीन आढळते. टोमॅटोची बारिक पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्यावर लावा आणि समाज करा. काही वेळ तसेच राहू द्या, त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरही चमक येईल. थोडे तांदूळ भिजवून बाजूला ठेवा. यानंतर तांदळाच्या पाण्यात थोडेसे कोरफडीचे जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा, त्याची घट्ट पेस्ट बनवा.
बऱ्याच वेळा आपल्याला अचानक पार्टीला वगैरे जावे लागते. मग अशावेळी पार्लरमध्ये जाऊन फेसपॅक करणे शक्य होत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील थकवा दूर करून तजेलदार त्वचा मिळू शकतो. हे घरगुती उपाय नेमके कोणते आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
1 / 5
धूळ आणि मातीमुळे चेहऱ्यावर मृत त्वचेच्या पेशी जमा होतात. त्यामुळे चेहरा खूप निस्तेज दिसू लागतो. थकव्यामुळे, निस्तेजपणा आणखी वाढतो. या समस्या दूर करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर दुधाने मसाज करा. काही वेळ दूध चेहऱ्यावर राहूद्या आणि त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
2 / 5
त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोमॅटो वापरा. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडेंट लाइकोपीन आढळते. टोमॅटोची बारिक पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्यावर लावा आणि समाज करा. काही वेळ तसेच राहू द्या, त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरही चमक येईल.
3 / 5
थोडे तांदूळ भिजवून बाजूला ठेवा. यानंतर तांदळाच्या पाण्यात थोडेसे कोरफडीचे जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा, त्याची घट्ट पेस्ट बनवा. थोडासा मसाज करा आणि कोरडा झाल्यावर चेहरा धुवा.
4 / 5
बेसनचे पीठ घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटे पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)