
संत्र्याच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. तुमच्या त्वचेवर अनेकदा पिंपल्स येतात, मग अशावेळी आपल्या त्वचेवर संत्र्याचा रस लावा. संत्र्याच्या रसामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.

गाजराचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते. गाजर चिरल्यानंतर त्याचा रस एका भांड्यात काढा. हा रस कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.

उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग होण्याची समस्या अनेकदा लोकांना होते. टॅनिंग आणि सनबर्न दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा रस काढा आणि चेहऱ्यावर लावा. ते कोरडे झाल्यावर सामान्य पाण्याने धुवा.

आवळा व्हिटॅमिन सी ने भरपूर प्रमाणात त्वचेच्या काळजीसाठी खूप चांगला मानला जातो. आवळ्याचा रस त्वचेवर लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवून त्वचेची काळजी घेण्यासाठी डाळिंबाचा रस वापरता येतो. असे म्हटले जाते की त्याचा नियमित वापर केल्याने त्वचा चमकदार होते. तसेच त्वचा सुंदर होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)