पावसाळ्यात पाली घरात येत असतील तर हा घरगुती उपाय करा, 1 मिनिटात पाल होईल गायब
पावसाळ्यात तुमच्या देखील घरात पाली येत असतील तर आताच व्हा सावध. लगेच करा हा घरगुती सर्वात सोपा उपाय. एका मिनिटांमध्ये घरातून पाली जातील बाहेर. जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्याच्या दिवसांत घरात पालींचा वावर वाढल्याचे अनेकांना जाणवते. भिंती, खिडक्यांच्या चौकटी, दरवाजामागील जागा आणि घरातील कोपरे ही त्यांची आवडती ठिकाणे असतात. घरात कीटक, डास, माश्या यांसारखे अन्न सहज उपलब्ध होत असल्याने तसेच सुरक्षित निवारा मिळत असल्याने पाली घरात येतात.

वातावरण अनुकूल असल्यामुळे या काळात त्यांची प्रजनन प्रक्रियाही वेगाने होत असून संख्या वाढण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, छिपकलीच्या विष्ठा, लघवी आणि लाळेमध्ये साल्मोनेला हा जीवाणू असू शकतो. हा जीवाणू अन्नामध्ये गेल्यास उलट्या, जुलाब आणि फूड पॉइझनिंगचा धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच घरात पालींची संख्या वाढल्यास अस्वच्छता, दुर्गंधी आणि त्वचेच्या संसर्गाचाही धोका वाढू शकतो. पालींचा त्रास कमी करण्यासाठी घराची नियमित स्वच्छता राखणे, कीटकांची उत्पत्ती होऊ न देणे आणि रात्री अनावश्यक दिवे सुरू ठेवणे टाळणे महत्त्वाचे आहे.

प्रकाशामुळे कीटक घरात आकर्षित होतात आणि त्यांच्या मागोमाग पालीही घरात येतात. याशिवाय, काळी मिरी व तंबाखूचे मिश्रण करून तयार केलेला स्प्रे, तसेच कांदा, लसूण आणि अंड्यांच्या टरफलींचा वापरही छिपकली दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

या वस्तूंच्या तीव्र वासामुळे पाली त्या ठिकाणापासून दूर राहतात. मात्र, घर स्वच्छ ठेवणे आणि कीटकांवर नियंत्रण ठेवणे हा पालींचा त्रास कमी करण्याचा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो.