AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंची झोप उडवणारं भाकित, आता आमदारही फुटणार; केंद्रीय मंत्र्याच्या विधानाने खळबळ

Shivsena UBT : आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण एका केंद्रीय मंत्र्याने याबाबत मोठं भाकित केलं आहे.

उद्धव ठाकरेंची झोप उडवणारं भाकित, आता आमदारही फुटणार; केंद्रीय मंत्र्याच्या विधानाने खळबळ
Ramdas Athavale on Uddhav thackerayImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 03, 2026 | 7:07 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे. अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरलेली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. आठवले नेमकं काय काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटणार – आठवले

कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी म्हटले की, ‘आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आंदोलन करणं हेच काम राहिलं आहे. खासदार फुटले आहेत आता आमदार देखील फुटतील. अयोध्या मंदिरात घोटाळा झाला आहे, रामाशी बेईमानी करणं योग्य नाही. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राम मंदिरात झालेला घोटाळा एनडीए खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन घ्यावं.’

एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे नेते – आठवले

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार-खासदार ठेवण्याची कुवत नाही. या सगळ्या फोडाफोडीला अमित शाह यांना जबाबदार धरू नये. हे ऑपरेशन टायगर आहे, ऑपरेशन देवेंद्र नाही. एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे खरे नेते आहेत अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे जात आहेत.’

राज ठाकरे हे भूमिका बदलणार नेते – आठवले

रामदास आठवले यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘इतके आमदार-खासदार आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील आमच्याकडे यावे. राज ठाकरे यांना आमदार निवडून आणता येत नाही, त्यामुळे ते आमदार फुटतात असं म्हणतात. पण ते आमदार आमच्याकडे येतात, जे येतात त्यांना आम्ही घेतो. राज ठाकरे असं बोलतात म्हणून त्यांचे आमदार निवडून येत नाहीत. राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहेत.’

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ