महिनाभर चहा पिणं बंद केलं तर शरीरात काय बदल होतो? जाणून घ्या

आपल्या देशात जवळपास 90 टक्के लोकांचं चहा हे आवडतं पेय आहे. सकाळी उठल्यापासून चहाची तलफ येते. अनेक जण दिवसाला दहा दहा कप चहा पितात. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. पण चहामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात.

| Updated on: Jan 17, 2025 | 8:41 PM
1 / 5
महिनाभर चहा सोडणं खरं तर हे एक मोठं आव्हान आहे. पण आरोग्यासाठी तुम्ही मनाशी दृढ निश्चय करून करू शकता. चहामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. यामुळे कॅलरीज वाढतात. पण तुम्ही चहा सोडला तर वजन कमी झाल्याचं दिसून येईल. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. एक महिना गोड चहा पिणं सोडलं तर तुमची पचनक्रिया सुधारते.

2 / 5
महिनाभर गोड चहा न पिल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते, असे अनेक शोधनिबंधांमध्ये दिसून आले आहे. त्वचा निरोगी ठेवायची असेल तर गोड चहा न प्यायलेलाच बरा.. कारण गोड चहामुळे त्वचेवर पिंपल्स आणि डाग पडतात.

3 / 5
महिनाभर चहा न प्यायल्याने आपल्या शरीरातील कॅफिनचे प्रमाण कमी होते. यामुळे आपल्याला गाढ आणि चांगली झोप मिळते. आपल्या शरीरातील तणावही कमी होतो.

4 / 5
तुम्ही महिनाभर गोड चहा प्यायला नाही तर तुम्हाला शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. यामुळे कामाची उत्पादकता देखील वाढते. चहा पिणे टाळल्यास डिहायड्रेशनशी संबंधित समस्या कमी होते. तसेच पेशींना नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स कमी होतात.

5 / 5
चहाची सवय सोडल्यास छातीत जळजळ, चक्कर येणे आणि हृदयाच्या गतीमध्ये चढ-उतार यासारख्या समस्या दूर होतात. जर तुमचे हात थरथरत असतील तर चहा प्यायल्याने ही समस्या वाढू शकते. जर तुम्ही चहा पिणे बंद केले तर तुमचा उच्च रक्तदाब सामान्य होईल.