
पालक, गाजर आणि सफरचंदाचा रस - हे कॉम्बिनेशन जरा विचित्र वाटू शकते, परंतु ते पोषक तत्वांनी भरलेले आहे.

संत्री, गाजर आणि आल्याचा रस - संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. गाजरमध्ये बीटा कॅरेटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही वजन कमी करण्यास आणि पचनास मदत करु शकतात.

डाळिंब आणि बीटचा रस - हा रस डिटॉक्सिफाईंग गुणांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्याशिवाय हा डाळिंब आणि बीट सोबतच यामध्ये कोरफडीचा गर मिसळल्यास याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

आलं, लिंबू आणि मधाचा चहा - या चहाला तुम्ही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गळ्यातील खरखर असल्यास आणि सर्दी झाल्यास घेऊ शकता. यामध्ये आलं, लिंबू आणि मधाचा वापर केला जातो. त्याशिवाय, हे इतर आरोग्यादायी फायद्यांसाठीही ओळखले जाते.

आवळ्याचा रस - आवळ्याचा रसात फक्त विटामिन-सीच असते असं नाही. आवळ्याच्या रसाचे आणखीही फायदे आहेत. याने तुमचं मेटाबॉलिज्म वाढण्यात मदत होते. तसेच, सर्दी आणि खोकला सारख्या व्हायरल आणि बॅक्टेरिअल संसर्गापासूनही बचाव करतो.