30 कोटींचं बजेट, कमाई 300 कोटींच्या पार.. या वर्षातील दमदार चित्रपट

या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानने केली आहे. यामध्ये नसलेन, सँडी मास्टर, अरुण कुरियन आणि चंदू सलीम कुमार यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या कमाईने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.

| Updated on: Oct 16, 2025 | 9:44 AM
1 / 5
2025 या वर्षांत बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. यामध्ये कुली, हिट 3, तुडारम आणि एल 2 एम्पुरान यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. अशातच एका कमी बजेट असलेल्या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

2 / 5
अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने फक्त माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चांगली कमाई केली. कमाईचा आकडा पाहून चित्रपट व्यापार विश्लेषकसुद्धा थक्क झाले होते. या चित्रपटाचं नाव आहे 'लोका: चाप्टर 1'. अनपेक्षितपणे बॉक्स ऑफिसवर त्याने कमाल करून दाखवली.

3 / 5
अवघ्या 30 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. यामध्ये कल्याणी प्रियदर्शनची मुख्य भूमिका आहे. तिने यात महिला सुपरहिरोची भूमिका साकारली आहे.

4 / 5
'लोका : चाप्टर 1'च्या प्रमोशनवर फारसा पैसा खर्च करण्यात आला नव्हता. तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर त्याची तगडी ओपनिंग झाली आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला. पहिल्या आठवड्यातील रविवारपर्यंत या चित्रपटाने 10 कोटी रुपये कमावले होते.

5 / 5
या चित्रपटात कल्याणी प्रियदर्शनने चंद्राची भूमिका साकारली आहे, जी अवयवांची तस्करी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश करते. एका आठवड्यात या चित्रपटाने जगभरात कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला होता. हा मूळ चित्रपट मल्याळम भाषेत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 301.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.