Long Weekend Trip: शिमला-मनालीला विसरा; दसऱ्याच्या सुट्टीत या 4 ठिकाणी मारा फेरफटका , ट्रिप आयुष्यभर आठवणीत राहील
दसऱ्याच्या सुट्टीमुळे शिमला-मनाली भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अनेक पर्यटक पंजाप, राजस्थानमधील ठिकाणांना भेट देऊ शकता.

लाँग वीकेंडच्या सुट्टीला जायचं आहे. परंतु तुम्हाला वाहतूक कोंडीत अडकायचं नाही, तर शिमला-मनालीपेक्षा इतर पर्याय बेस्ट ठरतील. तुम्ही शिमला-मनालीऐवजी राजस्थान, पंजाबला जाऊ शकता.
भरतपूर (राजस्थान) भरतपूरमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. या उद्यानात जवळून पक्षी पाहायला मिळतील. भरतपूरला जाण्यासाठी दिल्ली आणि आग्रा येथून ट्रेन जाते.
अमृतसर (पंजाब) तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड असेल. तर तुमच्यासाठी अमृतसर बेस्ट ठिकाण आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात जाऊ शकता. जालियनवाला बाग येथे जाऊ शकता. अमृतसरला जाण्यासाठी राजधानी दिल्लीतून अनेक गाड्या आहेत. मुंबईतूनही अमृतसरला जाण्यासाठी अनेक सुविधा आहेत. अमृतसर रेल्वे स्टेशनवरून मंदिरात जाण्यासाठी बस स्टँड, रिक्षा, टॅक्सीचा पर्याय उपलब्ध आहे.
जयपूर (राजस्थान) तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणे आवडत असतील, तर तुम्ही जयपूरला भेट देऊ शकता. जयपूरमध्ये तुम्हाला हवा महल, आमेर किल्ला, सिटी पॅलेस सारख्या ठिकाणांवर जाता येईल. या व्यतिरिक्त विविध बाजारातही जाऊ शकता. राजस्थानी जेवण, पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
उदयपूर (राजस्थान) तुम्हाला निसर्गाचं सौंदर्य पाहायला आवडत असेल, तर उदयपूरला भेट देऊ शकता. उदयपूरमधील पिछोला तलाव, सिटी पॅलेस या सारख्या ठिकाणी आवर्जून भेट देऊ शकता. तलावाकाठी वेळ घालवू शकता. या शहरात बससेवा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात कुठेही सहज फेरफटका मारू शकता.