
महाराष्ट्राचं लाडकं कपल अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यामुळे आता केळवणालासुद्धा सुरुवात झाली आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या लग्नासाठी मिताली आणि सिद्धार्थनं हा खास लूक केला आहे.

अभिज्ञाच्या लग्नात या दोघांनी मस्त फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये दोघंही एकमेकांसोबत प्रचंड खूश दिसत आहेत.

खरंतर या दोघांच्या फोटोमधून नेहमीच त्यांची केमेस्ट्री दिसते, मात्र त्यांचे हे फोटो कपल गोल्स देत आहेत.

'Lost in your current like a priceless wine.?'असं कॅप्शन देत मितालीनं हे फोटो शेअर केले आहेत.