आता LGP गॅस ट्रान्सफर आणखी सोपं, एक रुपयाही द्यावा लागणार नाही; काय बदल झाला?
आता स्वत:च्या नावावर गॅस ट्रान्सफर करून घेणे हे खूप सोपे झाले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त फी भरावी लागणार नाही. ही प्रक्रिया सरकारने आणखी सोपी आणि सुलभ केली आहे.

इंधन टंचाईमुळे भारत सरकार अनेक नियमांत बदल करत आहे. सरकार आता गॅस सिलिंडरच्या कनेक्शनऐवजी पीएनजीच्या कनेक्शनला प्राधान्य देत आहे.

आता सरकारने एलपीजी गॅस कनेक्शन ट्रान्सफर आणखी सुलभ केले आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आता गॅस कनेक्शन ट्रान्सफर करणे सुलभ होणार आहे. सामान्यांची परेशानी वाचणार असून खिशालाही झळ बसणार नाही.

ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्याच व्यक्तीचा कधीकधी मृत्यू होतो. त्यामुळे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घेणे गरजेचे असते. आता अशा प्रकारे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घेण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. जमा असलेल्या पैशांमध्येच तुमच्या नावावर गॅस कनेक्शन केले जाईल.

गॅस कनेक्शन आपल्या नावावर ट्रान्सफर न झाल्याने अनेक कुटुंबीय अन्य लोकांकडून गॅस सिलिंडर घेऊन स्वयंपाक करत होते. परंतु आता हे टेन्शन मिटले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या रक्ताचे नातेवाईक एक रुपयाही अतिरिक्त न देता गॅस कनेक्शन आपल्या नावावर करू शकतात.

तसेच एखादी व्यक्ती मृत व्यक्तीच्या रक्ताची नातेवाईक नसेल तर गॅस कनेक्शन आपल्या नावावर करण्यासाठी जमा रक्मक आणि सध्या लागणारी फी यात जेवढा फरक असेल तेवढेच पैसे भरून तुम्हाला गॅस कनेक्शन आपल्या नावावर करता येणार आहे.