माधुरी दीक्षितचं हे दर्दभरी गाणं आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी, आजही हृदयाला भिडतं

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचं प्रचंड दर्दभरी गाणं, जे प्रत्येक महिलेचं बनलं आवडतं. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे आजही प्रचंड सुपरहिट. ऐकताच महिला...

| Updated on: Aug 10, 2026 | 3:53 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघात जुनी होत नाहीत. उलट प्रत्येक वेळी ऐकल्यावर त्यांच्या भावना मनाला स्पर्श करून जातात. असंच एक गाणं म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटातील ‘मैं कमजोर औरत ये मेरी कहानी’.

2 / 5
तब्बल अनेक वर्षांनंतरही हे गाणं ऐकताना संघर्ष करणाऱ्या आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या स्त्रीच्या वेदना डोळ्यांसमोर उभ्या राहतात. माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता.

3 / 5
चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यातीलच एक गाणं म्हणजे ‘मैं कमजोर औरत ये मेरी कहानी’.

4 / 5
या गाण्यात माधुरी दीक्षितने साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यातील वेदना, असहायता आणि संघर्ष अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आला होता. त्यामुळे हे गाणं केवळ एक गीत न राहता एका मजबूर स्त्रीच्या मनातील भावना व्यक्त करणारं ठरलं.

5 / 5
या गाण्याला भारताच्या महान गायिका लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला होता. त्यांच्या भावपूर्ण आवाजामुळे गाण्यातील प्रत्येक शब्द अधिकच हृदयस्पर्शी झाला. गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले होते तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us