
महाकुंभ मेळ्यात नागा साधु होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. या दीक्षा विधीला सुरुवात झाली आहे. जुन्या आखाड्याने हा विधी सुरू केला आहे.

अंघोळीनंतर साधकांना चंदन लेप लावण्यात येतो. डोक्याला आणि दंडला हा लेप लावण्यात येतो.

नागा साधु होण्यासाठी सात पिढ्यांचे पिंडदान करावे लागते. त्यात नागा साधु स्वतःचे पण पिंडदान करतो.

मौनी अमावस्याच्या दिवशी जुना आखाड्याचे प्रमुख अवधेशानंद गिरी गुरुमंत्र देऊन नागा संन्याशांना दीक्षा देतील.

त्यापूर्वी त्यांचे मुंडण आणि दाढी करण्यात येते

नागा साधु होण्यासाठी शिस्तीत, एका रांगेत अगोदर अंघोळीला नेण्यात येते. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते.