
बुलढाणा जिल्ह्यातल्या देवखेड येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी चक्क थर्मकोल वर बसून शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करतात .

खडकपूर्णा नदीचे 600 फुटाचे पात्र पार करताना जीव मुठीत घेऊन आजपर्यंत प्रवास सुरू आहे . मात्र प्रशासन शेतकऱ्यांचा या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही .

याच गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नदीवर पुलाचे काम करण्यात आले , मात्र ठेकदाराने ते अर्धवट सोडल्याने आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे .

शेतातील सोयाबीन , उडीद मूग काढून घरी आणायचा आहे, मात्र रस्ता नसल्याने शेतात अनेक दिवसापासून जाऊ शकत नाही .

त्यामुळे पुलाचे काम करून रस्ता सुरळीत करावा , अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.