Gold Rate : मोठी खुशखबर! सोन्याचा भाव प्रचंड घसरला, एकाच दिवसात तब्बल…10 ग्रॅमचा भाव पाहून लोकांमध्ये आनंदाची लाट!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण होत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव प्रचंड घसरला आहे. या घसरणीनंतर सामान्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Mar 18, 2026 | 8:53 PM
1 / 5
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धामुळे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारविषयक अनिश्चितता यामुळे सोने आणि चांदीच्या भावात कधी वाढ तर कधी घसरण होताना पाहायला मिळत आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धामुळे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारविषयक अनिश्चितता यामुळे सोने आणि चांदीच्या भावात कधी वाढ तर कधी घसरण होताना पाहायला मिळत आहे.

2 / 5

दरम्यान, सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात आज दिवसभरात तब्बल 3 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 9 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3 / 5

या घसरणीनंतर आता सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 58 हजार 105 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 57 हजार 500 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सोन्याचा भाव घसरल्याने सामान्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय.

4 / 5

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याने चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम झाला असून गेल्या 18 दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार सुरू आहे. आता भविष्यात काय होणार, असे उत्सुकतेने विचारले जात आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us