Weather Update : दुष्काळाचं सावट संपणार! राज्यभर धो धो पाऊस कोसळणार, कुठे वादळ तर कुढे मुसळधार; वाचा तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती?

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत, विशेषतः विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर, तसेच ठाणे आणि मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी हवामानात अचानक बदल दिसू शकतात.

| Updated on: Sep 21, 2026 | 7:11 PM
1 / 7
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून पावसाचे प्रमाण घटले आहे. दीड महिना अपुऱ्या पावसामुळे शेतकरीही अडचणीत आले होते. खरीप हंगामातील पावसाच्या कमतरतेचा परिणाम शेतीवर दिसून येत आहे. मात्र, आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून पावसाचे प्रमाण घटले आहे. दीड महिना अपुऱ्या पावसामुळे शेतकरीही अडचणीत आले होते. खरीप हंगामातील पावसाच्या कमतरतेचा परिणाम शेतीवर दिसून येत आहे. मात्र, आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

2 / 7

नागपूर हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, २३ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

3 / 7

हवामान विभागाने २४ आणि २५ सप्टेंबरसाठी गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

4 / 7

बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली तयार झाल्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येत आहे. या प्रणालीमुळे विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २३ सप्टेंबरपासून राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल आणि येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक सक्रिय होऊ शकते.

5 / 7

दरम्यान, कोकण भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर, तसेच ठाणे आणि मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी हवामानात अचानक बदल दिसू शकतात.

6 / 7

येत्या काही दिवसांत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने येथील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्येही पाऊस पडू शकतो.

7 / 7

बऱ्याच काळापासून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा अंदाज दिलासादायक ठरू शकतो. विशेषतः विदर्भ आणि इतर पर्जन्यमान कमी असलेल्या भागांमध्ये, येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडल्यास कृषी आणि जलस्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. तथापि, मुसळधार पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना हवामान विभागाच्या नवीनतम सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us