डिसेंबरच्या गुलाबी थंडीत फिरायला जायचंय? ही ठिकाणे अजिबात मिस करू नका
Maharashtra Best Tourist Places for December : राज्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. अनेकजण डिसेंबरमध्ये फिरायला जाण्याची योजना आखत आहेत. आज आम्ही तुम्हाला डिसेंबरच्या गुलाबी थंडीत फिरायला जाण्यासाठी खास असलेल्या ठिकाणांची माहिती सांगणार आहोत.
Maharashtra top 5 best places for winter
Image Credit source: Google
बापू गायकवाड |
Updated on: Nov 22, 2025 | 10:50 PM
महाबळेश्वर : तुम्हाला डिसेंबरमध्ये गुलाबी थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर महाबळेश्वर हा उत्तम पर्याय आहे. या काळात स्ट्रॉबेरीचाही हंगाम सुरू होतो. येथे तु्म्ही आर्थर सीट पॉइंट, विल्सन पॉइंट, वेण्णा लेक (बोटिंग) या ठिकाणांना भेट देऊ शकता.
पाचगणी : पाचगणी हे ठिकाण महाबळेश्वरच्या जवळच आहे. येथील निसर्ग आणि दऱ्यांचे दृश्य खूप सुंदर आहे. येथे तुम्ही टेबल लँड, सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट या ठिकाणांना भेट देऊ शकता.
चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. येथे कॉफीची शेती केली जाते. येथे गेल्यावर तुगाविलगड किल्ला आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देता येईल.
आंबोली (सिंधुदुर्ग): आंबोली हे कोकणातील थंड आणि शांत ठिकाण आहे. येथील निसर्ग खूप सुंदर आहे. येथे तुम्ही आंबोली घाट, हिरण्यकेशी मंदिर, सनसेट पॉइंटला भेट देऊ शकता.
इगतपुरी : इगतपुरी हे नाशिकजवळचे एक शांत आणि कमी गजबजलेले ठिकाण आहे. येते ट्रेकिंगसाठी लोक येतात. येथील भातसा व्हॅली, कळसूबाई शिखर (जवळच), विपश्यना केंद्र आहे. तु्म्ही या ठिकाणांना भेट देऊन गुलाबी थंडीचा आनंद घेऊ शकता.