Gaurav More : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गुपचूप अडकला लग्नबंधनात? ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचा तो फोटो समोर, अभिनेत्रीने उलगडलं गुपित

प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे गुपचूप विवाहबंधनात अडकला आहे. चाहत्यांसाठी ही एक सुखद धक्का देणारी बातमी आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे गौरवच्या विवाहाबद्दल माहिती समोर आली आहे. गौरवने त्याची प्रेयसी प्रियांका कारेकर हिच्यासोबत लग्न केले असून, त्यांनी नुकताच नव्या घरातही प्रवेश केला आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 10:01 AM
1 / 7
 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ , 'चला हवा येऊ द्या' अशा अनेक कार्यक्रमांमधून घराघरांत पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता  म्हणजे गौरव मोरे.  ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ नावाने प्रसिद्ध असलेल्या गौरव मोरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सर्वांच्या लाडक्या या गौरव मोरेने गुपचूप लग्न केलं आहे. हो , हे खरं आहे, गौरव हा लग्नबंधनात अडकल्याचे समोर आलं आहे.( Photos : Instgram)

2 / 7
लग्नाबद्दल गौरव किंवा त्याच्या पत्नीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा अथवा पोस्ट केलेली नाही. पण असं असलं तरी गौरव याची जवळची मैत्रीण, आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्या एका पोस्टमुळे गौरवच्या लग्नाचं गुपित सर्वांसमोर उलगडलं आहे. ऋतुजा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी ठेवत गौरव मोरे आणि त्याची पत्नी प्रियांका कारेकर यांचा फोटो शेअर केला, त्यासोबतच तिने लिहीलेल्या कॅप्शनमुळे गौरवच्या लग्नाच्या बातमीवर एका प्रकारे शिक्कामोर्तबच झालं आहे.

3 / 7
गौरव मोरेने त्याच्या गर्लफ्रेंडशी विवाह केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आजच त्यांच्या नव्या घरातही प्रवेश केला आहे. याच खास प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर ऋतुजाने गौरव आणि त्याच्या पत्नीसह फोटो शेअर करत अभिनंदन केलं असून दोघांचाही उल्लेख मि. अँड मिसेस मोरे असा केला आहे. याच कॅप्शनवरून गौरव मोरेचं लग्न झालंय हे स्पष्ट होतंय.

4 / 7
अभिनेत्री ऋतुजा बागवेने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या फोटोत ती गौरव आणि प्रियांकासोबत उभी असून, त्यावेळी गौरवची पत्नी सुंदर साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातावर मेहंदी, हिरवा चुडा अशा स्वरुपात दिसली.  ‘मिस्टर अँड मिसेस मोरे,’ असंही लिहीत ऋतुजाने भलीमोठ्ठी पोस्ट लिहीलं असून त्यांचं नव्या प्रवासासाठी अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या आहेत.

5 / 7
“मिस्टर अँड मिसेस मोरे तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! तुम्हाला आयुष्यभर प्रेम, आनंद आणि सुख लाभो, हीच सदिच्छा,” असं ऋतुजा बागवेने या पोस्टवर लिहिलं आहे. ‘करू आणि बच्ची गॉड ब्लेस यू’ असंही ऋतुजाने लिहिलं आहे.

6 / 7
गौरवने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं असलं तरीही ‘सोनी मराठी’वरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून तो खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचला.या शोमधील त्याच्या विविध भूमिका लोकांना खूप आवडल्या. त्याच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

7 / 7
तर गौरवची पत्नी प्रियांका कारेकर ही देखील मनोरंजन विश्वाशी निगडीत असून तिने आर. बाल्की, गौरी देशपांडे यांसारख्या  बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांसोबतही काम केलं आहे.

Follow Us