
बॉलिवूड आणि क्रिकेटचे अगदी जवळचे नाते आहे. अनेक क्रिकेटपटू हे मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींना डेट करत असल्याचे पाहायला मिळते. एक काळ असा होता जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचे नाव देखील या यादीत घेतले जायचे. पण माहीचे हे नाते फार काळ टिकले नाही. अवघ्या दोन वर्षांमध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. आता ही अभिनेत्री कोण होती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

महेंद्रसिंह धोनी हा अभिनेत्री राय लक्ष्मीच्या प्रेमात होता. दोघेही सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसायचे. खासकरून जेव्हा क्रिकेट सामने असायचे तेव्हा राय लक्ष्मी ही धोनीला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये बसलेली दिसायची. पण त्यांचे हे नाते दोन वर्ष टिकले.

धोनी आणि राय लक्ष्मी यांच्यामध्ये सतत वाद होऊ लागले. त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये फूट पडली आणि जवळपास दोन वर्षानंतर त्यांनी ब्रेकअप केला. त्यांच्या ब्रेकअपचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण एका मुलाखतीमध्या राय लक्ष्मीने माहीसोबतच्या नात्यावर वक्तव्य केले होते.तर दुसरीकडे माहीने कधीही यावर प्रतिक्रिया दिली नाही.

एका मुलाखतीमध्ये राय लक्ष्मीला महेंद्रसिंह धोनीसोबत असलेल्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने हे नातं माझ्यासाठी आयुष्यातील मोठ्या जखमेसारखे असलल्याचे म्हटले होते. 'माझं धोनीसोबतचं नातं हे एखाद्या डागाप्रमाणे किंवा जखमेच्या निशाणाप्रमाणे आहे. ही खून बराच काळ कायम राहणार आहे, असं मी गृहित धरलेलं आहे' असे राय लक्ष्मी म्हणाली.

राय लक्ष्मी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २००५ साली अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. तिने कारका कसाद्रा या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले होते.