
साऊथ सुपरस्टार महेश बाबू फिल्मी दुनियेतील मोठं नाव आहे. त्याने अनेक चित्रपटात अभिनय केलाय. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. आता त्याचे फॅन्स आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महेश बाबूने आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केलय. पण तुम्हाला हे माहित आहे का, 20 वर्षांपूर्वी त्याने एका अशा अभिनेत्रीसोबत रोमान्स केलेला, नंतर तिच्याच मुलाचा रोल त्याने साकारला.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय. ती अजून कोणी नाही, राम्या कृष्णन आहे. बाहुबलीमध्ये तिने शिवगामी देवीचा रोल साकारलेला. 2004 साली आलेल्या नानी चित्रपटात तिने आणि महेश बाबूने रोमान्स केलेला. महेश बाबूने तिच्यासोबत रोमँटिक सीन्स दिलेले.

लोकांना त्यावळी ती जोडी आवडलेली. त्यावेळी राम्या कृष्णन टॉप अभिनेत्रींच्या कॅटेगरीमध्ये होती. त्यानंतर ही जोडी आई-मुलाच्या रुपात 2024 साली आलेल्या 'गुंटूर करम' चित्रपटात दिसली.

या चित्रपटात महेश बाबूच्या अपोजिट श्रीलीला लीड रोलमध्ये होती. फिल्म लोकांना खूप आवडली. दोन्ही चित्रपटात महेश बाबू आणि राम्या कृष्णने आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली.