Salman Khan : “सलमान भाई काय आहे ना, कोणालाच माहिती नाही…”; समोर कधीच न आलेले सलमान खानचा किस्सा

Salman Khan : अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेता फक्त त्याच्या सिनेमांमुळेच चर्चेच नसतो, तर इतर कारणांमुळे देखील चर्चेत असतो. सलमान खान अनेकांच्या मदतीसाठी देखील धावून दातो. भाईजानबद्दल ही गोष्ट फार कोणाला माहिती नसेल, पण अभिनेत्याने मुलांसाठी असं काही केलं ज्यामुळे मुलांच्या आई - वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं..

| Updated on: Nov 21, 2026 | 2:59 PM
1 / 5
सध्या अभिनेता सलमान खान 'मातृभूमी' सिनेमामुळे चर्चेत आहे. याच दरम्यान प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर महेश लिमये यांनी भाईजानबद्दल मोठा खुलासा केला. सध्या सर्वत्र महेश यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत आहे. 'दबंग' सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा किस्सा त्यांनी सांगितला आहे.

सध्या अभिनेता सलमान खान 'मातृभूमी' सिनेमामुळे चर्चेत आहे. याच दरम्यान प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर महेश लिमये यांनी भाईजानबद्दल मोठा खुलासा केला. सध्या सर्वत्र महेश यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत आहे. 'दबंग' सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा किस्सा त्यांनी सांगितला आहे.

2 / 5

महेश म्हणाले, 'सलमान भाई काय आहेत ना, कोणालच नाही माहिती... पण तो मनाने फार दिलदार माणूस आहे, राजा माणूस आहे... एकदा जॅगिंग करत होते ते, रस्त्यावर त्यांना छोटी छोटी मुलं खेळताना दिसले. सलमान याने विचारलं, शाळेत कुठे जाता, मुल म्हणाली लांब जावं लागतं...'

3 / 5

पुढे महेश असं देखील म्हणाले की, त्यानंतर सलमान खान मुलांना आई - वडिलांसोबत सेटवर बोलावलं. जवळपास 15 - 20 पोरं त्यांच्या आई - वडिलांसोबत सेटवर पोहोचली. ट्रकभर नवीन सायकली आलेल्या. त्यानंतर, सलमान खान याने प्रत्येक मुलाला आणि आई - वडिलांना सांगितलं. आता सायकलीने शाळेत जात.. लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. एवढं कोण करतं. हे कोणाला माहिती नाही, कुठे आलेलं मीडियामध्ये..

4 / 5

सलमान खान याच्या स्वभावाबद्दल महेश म्हणाले, 'पडद्यावर आणि खऱ्या आयु्ष्यातील सलमान मध्ये खूप फरक आहे. एखादी व्यक्ती त्याला आवडल्यानंतर तिच्यावर तो मनापासून प्रेम करतो. सलमान खान मोठा स्टार असला तरी, त्याच्यात माणुसकी आहे.'

5 / 5

सलमान खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेता 'मातृभूमी' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. तर 4 डिसेंबर रोजीच अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर 'ईठा' सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us