Mahesh Manjrekar: काय घडलं ते मला माहित आहे…तनुश्रीनं नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांवर महेश मांजरेकरांचा खुलासा
Mahesh Manjrekar On Nana Patekar : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच प्रकरण हे चांगलेच गाजलेले आहे. आता यावर महेश मांजरेकरांनी मोठा खुलासा केला आहे,

अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने गंभीर आरोप केले होते हे काही नवीन नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतरही तिने आरोप करणं सुरुच ठेवलं होतं. आता त्या सेटवर खरंच असं काही घडलं होतं का याबाबत महेश मांजरेकरांनी मोठा खुलासा केला आहे.
२००८ मधील हे प्रकरण आहे. 'हॉर्न ओके प्लीज' या फिल्मच्या शूटिंगवेळी नानांनी आपल्याला डान्स शिकवणाच्या बहाण्याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने तेव्हा केला होता. यानंतर ती म्हणाली होती की, नानांनी माझ्यामागे गुंड लावले होते. मला खूप त्रास दिला गेला."
नानांच्या निधनानंतरही ती या आरोपांवर ठाम राहिली. नाना यांनी सुरुवातीपासूनच तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तनुश्रीने तर नानांविरोधात पोलिसांत तक्रारही केली होती. पण पुराव्याच्या अभावापायी नानंना या प्रकरणात दिलासा मिळाला.
आता महेश मांजरेकरांनी न्यूज १८मराठीला मुलाखत दिलेल्या मुलाखतीत या घटनेवर स्पष्टच म्हणाले आहेत. ते म्हणाले, मला माहीत आहे ना काय झालं होतं ते सेटवर, मी तिथे असलेल्या सर्वांना विचारलं, तिथे काहीच झालं नव्हतं. मला तिकडे असलेल्यांनी सगळं सांगितलय."
महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, "पण आता कसं आहे ना की लोकांना त्या गोष्टीही हायलाईट करायला आवडतात, नानाने त्याकाळात खूप काही सहन केलं आहे. मला माहित आहे सगळं काय झालं आणि काय नाही ते."