AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omelete Making Tips: ऑम्लेट उलटताना त्याचे तुकडे होतात! न तुटता बनवण्याची खास टिप्स

Omelet Making Tips: खूप भूक लागलेली असेल आणि वेळ देखील कमी असेल तर, झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे ऑम्लेट.. पण अनेकदा ऑम्लेट उलटताना त्याचे तुकडे होतात. पण काही टिप्स वापल्यास ऑम्लेट तुटता मस्तच बनेल...

Omelete Making Tips: ऑम्लेट उलटताना त्याचे तुकडे होतात! न तुटता बनवण्याची खास टिप्स
| Updated on: Nov 07, 2026 | 3:30 PM
Share

अंडी अनेकांना आवडतात. आरोग्यासाठी देखील अंडी फार महत्त्वाची आहे. ऑम्लेट खाणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. लहान मुलांपासून मोठ्या लोकांना देखील ऑम्लेट आवडतं. पण अनेकांनी ऑम्लेट बनवताना अडचणी येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे,  नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी चांगले ऑम्लेट बनवताना, तव्यावरून उलटताना ते विस्कटल्यास अनेकांना निराशा येते. पण जर तुम्हाला स्वयंपाकघरातील काही सोप्या टिप्स माहित असतील, तर तुम्ही हॉटेलमध्ये मिळणाऱ्या ऑम्लेटप्रमाणे न तुटता, घरी सहजपणे एक मऊ आणि लुसलुशीत ऑम्लेट बनवू शकता.

ऑम्लेटला मऊ आणि हलकं बनवण्यासाठी, अंड्यांमध्ये थोडे मीठ आणि काळी मिरी घालून, काट्याच्या चमच्याने किमान 1 – 2 मिनिटं चांगल्या प्रकारे  फेटा. अंड्यांमधील लहान बुडबुडे ऑम्लेटचा पोत मऊ होण्यास मदत करतील. चांगले फेटल्यामुळे ऑम्लेट तयार झाल्यावर त्याला दुमडणे सोपे जाईल.

अंडं फेटताना त्यात एक चमचा दूध किंवा थंड पाणी घातल्यास ऑम्लेटला अधिक ओलावा आणि मऊपणा येतो. यामुळे ऑम्लेट तव्यावर लवकर जळत नाही आणि त्याला चवही येते. तसेच, ऑम्लेटच्या आकाराला साजेसा लहान नॉन-स्टिक तवा निवडा. तव्याला पुरेसे खोबरेल तेल लावा आणि तवा गरम झाल्यावरच त्यात अंडं घाला. यामुळे ऑम्लेट तव्याला चिकटणार नाही.

खालची बाजू लवकर करपू नये म्हणून, ऑम्लेट मध्यम किंवा मंद आचेवर शिजवा. वरची बाजू अर्धी शिजल्याशिवाय ते उलटवू नका याची काळजी घ्या. चमच्याने उलटवताना ऑम्लेटला तडा जाण्याची शक्यता वाटल्यास, पॅनवर एक सपाट प्लेट ठेवा आणि पॅन हळूवारपणे उचला. त्यानंतर, प्लेटवरून ऑम्लेट परत पॅनमध्ये ठेवल्यास, त्याला अजिबात तडा न जाता तुम्ही ते उलटवू शकता.

ऑम्लेटमध्ये जास्त कांदा, टोमॅटो, मिरची इत्यादी पदार्थ घालू नका. जर ते जास्त झालं, तर दुमडताना ते तुटेल. चीज आणि भाज्या खूप बारीक चिरलेल्या असाव्यात. जर दुमडताना अंडे फुटत असल्याचे तुमच्या लक्षात आलं, तर तुम्ही फुटलेल्या भागावर थोडे चीज लावू शकता. ते चिकटवण्याचं काम करेल. अशा प्रकार तुमचा चविष्ट ऑम्लेट घरीच काही मिनिटांत तयार होईल.

Follow Us
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....