AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 5 हजार रुपयांनंतर आता दिवाळीच्या मूहूर्तावर सरकारची मोठी घोषणा, निधीही वितरीत

राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना आग्रीम मदत म्हणून सरकारने पाच हजार रुपयांची घोषणा केली आहे. दरम्यान त्यानंतर आता आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 5 हजार रुपयांनंतर आता दिवाळीच्या मूहूर्तावर सरकारची मोठी घोषणा, निधीही वितरीत
सरकारची मोठी घोषणा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 3:31 PM
Share

यंदा एल निनोने मान्सूनचा खेळ बिघडवला, जुनचा शेटवचा आठवडा आणि संपूर्ण जुलै महिला चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर एल निनोचं सावट अधिक गडत होत गेलं आणि पाऊसच झाला नाही, संपूर्ण पावसाळा कोरडला गेला. ऑगस्टे, सप्टेंबर अन् ऑक्टोबर महिन्यात पावसाने दडी मारली. पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम तर हातचा गेला, मात्र रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला देखील पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी अजूनच संकटात सापडले. यंदा शेतीत उत्पन्नच न निघाल्याने आता जगायचं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अन्न-धान्य टंचाईसोबतच जनावरांच्या चाऱ्याची देखील भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हातबल झाला आहे.

दरम्यान निराश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी काही दिवसांपूर्वीच सरकारने आग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपयांची घोषणा केली होती. राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या पैशांमुळे थोडा का होत नाही, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान त्यानंतर आता राज्य सरकारच्या वतीने आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत 116 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या निधीचं वितरण करण्यात आलं आहे. या निधीमुळे रखडलेल्या शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे. शेतापर्यंत बारमाही रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या कामांमुळे दुष्काळात शेतकऱ्यांना, शेतमजूंना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवच काम मिळणार आहे. त्यामुळे काही अंशी दुष्काळामुळे होणाऱ्या स्थलांतराला देखील अळा बसू शकतो. कुशल अनुदानाअभावी रखडलेल्या कामांना 116  कोटींच्या निधीमुळे चालना मिळणार आहे.  ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे, अशी माहिती यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. दरम्यान या कामांमुळे स्थानिक पातळीवर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.

Follow Us
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....