Maruti Jimny VS Mahindra Thar, कोणती गाडी ठरेल बेस्ट पर्याय? जाणून घ्या

| Updated on: Mar 25, 2023 | 2:51 PM

मारुति जिम्नी आणि महिंद्रा थार या दोन्ही गाड्या भारतात लोकप्रिय आहेत.मात्र विकत घेताना कोणता पर्याय निवडावा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे कोणती सर्वोत्तम ठरेल यासाठी आम्ही तुम्हाला तुलनात्मक माहिती देत आहोत. त्यामुळे तुम्हाला एक गाडी निवडणं सोपं होईल.

1 / 5
Maruti Suzuki Jimny vs Mahindra Thar : दोन्ही गाड्यांच्या आकारमानात थोडासा फरक आहे. पण असं असलं तरी दोन्ही गाड्या आकर्षक आहेत. जिम्नी गाडीची लांबी 3985 मीमी, रुंदी 1645 आणि उंची 1720 मीमी इतकी आहे. तर महिंद्रा थारची लांबी 3985, रुंदी 1820 मीमी आणि उंची 1850 मीमी आहे. दोन्ही गाड्यांची लांबी एक सारखीच आहे. (फोटो: Maruti & Jimny)

2 / 5
Maruti Suzuki Jimny vs Mahindra Thar : महिंद्रा थार 2WD च्या तीन रंगात सादर केली आहे. यात ब्रेझिंग ब्रॉन्झ एक्सटीरियर कलर थीमचा समावेश आहे. जिम्नी फक्त 5 डोअर वर्जनमध्ये सादर केली आहे. तर महिंद्रा 3 डोअर अवतारात हार्ड टॉप किंवा सॉफ्ट टॉपसह येते. (फोटो: Maruti & Jimny)

3 / 5
Maruti Suzuki Jimny vs Mahindra Thar : दोन्ही एसयुव्हीमध्ये क्रुझ कंट्रोल, मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेंमेंट सिस्टम, रियर पार्किंग सेंसर, हील होल्ड कंट्रोल, ईएसपी आणि हील डिसेंट कंट्रोलसह येतात. (फोटो: Maruti & Jimny)

4 / 5
Maruti Suzuki Jimny vs Mahindra Thar : जिम्नी फक्त 1.5 लिटर के15बी पेट्रोल इंजिनसह सादर केली आहे. हे इंजिन 103 बीएचपी आणि 134 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स किंवा 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटीकसह येते. महिंद्रा थार तीन इंजिन ऑप्शनसह येते. यात 1.5 लिटर डिझेल, 2.0 लिटर टर्बो आणि 2.2 लिटर डिझेल इंजिन आहे. 1.5 लिटर इंजिन 113 बीएचपी आणि 300 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सशी जोडलेलं आहे. (फोटो: Maruti & Jimny)

5 / 5
Maruti Suzuki Jimny vs Mahindra Thar : थारच्या रियर-व्हील ड्राइव्ह मॉडेलची किंमत 9.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. फोर-व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची किंमत 13.59 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 16.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. जिम्नीची किंमत अद्याप जाहीर केली नाही. मात्र, त्याची किंमत 10 ते 12 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे. (फोटो: Maruti & Jimny)