राष्ट्रपतींचे ADC झाल्याने अविवाहित राहावे लागते, मेजर ऋषभ संब्याल सांगितले सर्वकाही, द्रौपदी मुर्मू आईचे रूप..
मेजर ऋषभ सिंग संब्याल यांनी निवृत्ती घेतली. ऋषभ सिंग संब्याल कायमच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसत. त्यांचे अनेक रिस्सही व्हायरल होत. मात्र, त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने अनेकांना धक्का बसला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ADC विशेष सहाय्यक अधिकारी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून मेजर ऋषभ सिंग संब्याल काम करत आहेत. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला. ऋषभ सिंग संब्याल हे कायमच द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसत.
त्यांचे अनेक रिल्सही सोशल मीडियावर व्हायरल होत. दैनंदिन वेळापत्रक, सुरक्षा आणि गरज असल्याचे तात्काळ धावतानाही ऋषभ सिंग अनेकदा दिसले. त्यांनी नोकरी सोडल्याने अनेकांना धक्का बसला.
नुकताच ऋषभ सिंग यांनी फिगरिंग आऊट या पॉककास्टमध्ये काही गोष्टी बोलून दाखवल्या. ऋषभ सिंग यांनी म्हटले की, मी सामान्य लोकांसारखे बाहेर फिरायला जाऊ शकते नाही. राष्ट्रपतींसोबत सेवा बजावताना मी माझे सामान्य जीवन जगू शकत नव्हतो.
मी राष्ट्रपती मुर्मू यांचे ADC म्हणून तीन वर्ष काम केले. मी हीच सेवा सुरू ठेवण्याऐवजी लष्करातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नक्कीच माझ्यासाठी सोप्पा नव्हता.
यादरम्यान त्यांनी एक संदर्भ देत म्हटले की, राष्ट्रपतींचे एडीसी म्हणून काम करत असताना लग्न करता येत नाही. मी अविवाहित असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रपतींचे एडीसीसाठी अशी अट आहे की, ते लग्न करू शकत नाही.