‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; भावनिक, थरारक अन् अनपेक्षित क्षण

तुमच्या आवडत्या मालिकांंमध्ये येत्या आठवड्यात काय घडणार आहे, कथानकात कोणती रंजक वळणं येणार आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.. सनई चौघडे, कमळी आणि तारिणी या मालिकेत मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

| Updated on: Jun 30, 2026 | 1:01 PM
1 / 5
आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते. प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते आणि त्यातून प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते. म्हणूनच या आठवड्यात 'सनई चौघडे' , 'कमळी' आणि ' तारिणी' या मालिकांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेऊयात..

2 / 5
सनई चौघडे: पार्टीमध्ये जयची खोटी गर्लफ्रेंड बनण्याच्या प्रसंगामुळे शरू आणि जयमध्ये निर्माण झालेला तणाव एका अनपेक्षित घटनेनंतर बदलताना दिसणार आहे. पण अचानक आलेल्या अनपेक्षित वळणामध्ये जय शरूचा जीव वाचवणार आहे. आता त्यानंतर दोघांमधील नात्यात जवळीक निर्माण होईल का? हे बघणं औसुक्याच ठरणार आहे. दुसरीकडे, लग्नाला विरोध करणारा जय, गौतम आणि असावरीच्या पाठीशी उभा राहत अंधश्रद्धेलाही न जुमानता त्यांना साथ देणार आहे. याशिवाय वटपौर्णिमेच्या विशेष भागही मालिकेत साजरा होणार आहे.

3 / 5
कमळी: सरोजवर गोळीबार झाला. या धक्कादायक घटनेनंतर कमळी सरोजचे अंत्यसंस्कार पार पाडते आणि तिच्या मृत्यूमागचं सत्य शोधण्याची शपथ घेते. त्यासाठी ती मुंबईकडे नवा प्रवास सुरू करणार आहे. या प्रवासात ती केवळ सत्याचा शोध घेणार नाही, तर स्वतःच्या भूतकाळाशीही सामना करणार आहे. अनेक अनोळखी धागे उलगडत असताना कमळीसमोर नवी आव्हानं उभी राहणार असून तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे सत्य समोर येण्याची चाहूल या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

4 / 5
तारिणी : केदारने घटस्फोटाच्या कागदांवर केलेल्या सहीमुळे तारिणी आणि केदारच्या नात्यात गैरसमज निर्माण होतो. मात्र याच दरम्यान केदार आपल्या मनातील प्रेमाची कबुली देत तारिणीला प्रोपोज करतो. दुसरीकडे, तारिणी गुलाबची सखोल चौकशी करत असताना तिचे वरिष्ठ साधू सर यांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचं कळणार आहे. या बदलांमुळे तपासाला नवे वळण मिळणार असून तारिणीसमोर अनेक नवी आव्हाने उभी राहणार आहेत.

5 / 5
प्रेक्षकांसाठी हा पावरपॅक आठवडा असणार आहे. 'सनई चौघडे' ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता, 'कमळी' दररोज रात्री 9 वाजता आणि 'तारिणी' दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. म्हणजेच साडेआठ ते दहावाजेपर्यंत प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस मिळणार आहे.

Follow Us