
चंदन हे प्रसिद्ध आयुर्वेदीक वनऔषधी आहे. चंदनामुळे त्वचा थंड राहते. चंदनात त्वचेला थंड करणारे अनेक गुणधर्म आहेत. चंदनामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतात. चंदनामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.

चंदनाचा फेसपॅक तयार करण्यासाठी चंदनाची पावडर घ्या. त्यात हळद मिक्स करा. त्यात तुम्ही दोन चमचे दूध किंवा गुलाब जल मिसळून चांगली पेस्ट करु शकतात. तो चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.

कडुनिंब बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारा आहेत. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे निंबचे रस घ्या. त्यात बेसन आणि काही थेंब मध मिसळा. ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 5 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवून घ्या.

कोरफड हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे रात्रभर तुमची त्वचा चांगली राहते. एक चमचा एलोवेरा जेलमध्ये एक चमचा काकडीची पेस्ट मिसळा. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला आराम मिळेल.

गुळवेलला हृदयाच्या आकाराची पाने असतात. त्यामुळे त्याला कॉर्डिफोलिया हे नाव पडले. एक चमचा गुळवेल पावडर, एक चमचा दही आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. 15 मिनिटे चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.