हट्टीपणामुळे या अभिनेत्रीला वडिलांनी काढलेले घराबाहेर, आईचे आडनाव वापरून बनली प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती?
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री वडिलांनी तिच्या अभिनेत्री होण्याच्या हट्टामुळे काढलेले घराबाहेर. नंतर अभिनेत्रीने वापरले आईचे अडनाव. वयाच्या 22 व्या वर्षी दिले 2 हिट चित्रपट.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला घरातून बाहेर काढल्याचे तिने अनेकदा सांगितले आहे. मात्र, घर सोडल्यानंतरही तिने अभिनयाचे स्वप्न सोडले नाही.
मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा असून तिचा जन्म 24 ऑक्टोबर 1976 रोजी हरियाणातील हिसार येथे झाला. तिने दिल्ली विद्यापीठातील मिरांडा हाऊसमधून शिक्षण घेतले. बॉलिवूडमध्ये येताना तिने वडिलांचे आडनाव न वापरता आईच्या आडनावावरून ‘मल्लिका शेरावत’ हे नाव स्वीकारले.
2002 मध्ये जीना सिर्फ मेरे लिए या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ख्वाहिश आणि किस किस की किस्मत या चित्रपटांत काम केले. मात्र, 2004 मध्ये इमरान हाश्मीच्या सोबतीने आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने तिला मोठी ओळख मिळवून दिली. चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली.
यानंतर वेलकमसह अनेक हिंदी तसेच आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये तिने काम केले. मात्र, दीर्घ कारकिर्दीत मर्डर आणि वेलकम हे तिच्या प्रमुख यशस्वी चित्रपटांपैकी मानले जातात.
आज मल्लिका शेरावत केवळ चित्रपटांमुळेच नाही तर रिअॅलिटी शो, ब्रँड एंडोर्समेंट आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील उपस्थितीमुळेही चर्चेत आहे. ‘द ट्रेटर्स’ या रिअॅलिटी शोमधील तिच्या सहभागामुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.