
एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने बॉलिवूडवर राज्य केलं. आता मनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी ऑटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर सक्रिय असते.

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र मनिषा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. हटके लूकमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

फोटोंमध्ये अभिनेत्री क्लासी दिसत आहे. पण कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, मी आगीतून चालत परतली आहे....राखेच्या जागी प्रकाश घेऊन... असं लिहिलं आहे. सध्या तिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन नेटकरी फॉलो करतात तर, अभिनेत्री फक्त 2 हजार 8 नेटकऱ्यांना फॉलो करते.

वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री नियमित वर्कआऊट करत स्वतःला ग्लॅमरस ठेवते. दरम्यान, 'हीरामंडी' सीरिजमुळे मनिषा हिच्या लोकप्रियतेत पुन्हा वाढ झाली. आता दुसऱ्या सीझनच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.