Manoj Jarange Car : हीच ती आलिशान डिफेन्डर कार, ज्यामुळे मनोज जरांगे चर्चेत; काय आरोप केला जातोय?

या कारमधून मनोज जरांगे प्रवास करत असतानाचे व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. ही कार कोणी दिली असे विचारल्यानंतर जरांगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Aug 11, 2026 | 10:29 PM
1 / 5
मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे वापरत असलेली डिफेंडर कार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही कार जरांगेंना दौऱ्य़ासाठी कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

2 / 5

या कारमधून मनोज जरांगे प्रवास करत असतानाचे व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. ही कार कोणी दिली असे विचारल्यानंतर जरांगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5

मी समाजाचा काम करतो. समाजाला मी मायबाप मानले आहे. माझ्या समाजातल्या लोकांनी एखादी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असे म्हणतात, असे स्पष्टीकरण जरांगे यांनी दिले आहे.

4 / 5

तसेच, माझ्या अनेक गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर खूप बारीक लक्ष आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. माझा समाजच मला बसायला गाडी देतो, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

5 / 5

माझ्यावर जळणाऱ्याची संख्या खूप आहे. मी डिफेन्डरमध्ये फिरत असेल तर यांना नेमकी काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मी माझ्या समाजासाठी काम करतच राहणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us