माझा देवच माझं भलं करेल… नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिरांमध्ये झुकले हजारो माथे… पाहा Photo

नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने व्हावी म्हणून अनेका भाविकांनी मंदिकांमध्ये हजेरी लावली. देवाच्या पायथ्याशी झुकत अनेक भाविकांनी नव्या वर्षाची सुरुवात केली. अशात अनेक मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी जमली... सध्या महाराष्ट्रातील अनेक मंदिरातील फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Jan 01, 2026 | 3:45 PM
1 / 7
 विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाजनांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करणेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेगावात लाखो भाविकांची गर्दी झालीय.

2 / 7
महाजनांच्या दर्शनासाठी  भाविकांची दोन ते अडीच किलोमीटर रांग असून  तब्बल पाच तासांपेक्षा जास्त  कालावधी दर्शनासाठी लागत आहे. बुधवारी रात्रीपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले असतानाही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे ..

3 / 7
परळी वैद्यनाथ  येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे नववर्ष 2026 च्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.  नववर्षात नवीन संकल्प, मनोकामना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते.

4 / 7
 नाशिकच्या येवल्यात प्रसिद्ध असलेल्या मृत्युंजय महादेव मंदिरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या भक्ती भावाने करण्यात आले मंदिरात महापूजा करून महाआरती करण्यात आली भाविकांनी भगवान भोलेनाथाचा जयघोष करत नवीन वर्षाचे स्वागत केले.

5 / 7
चंद्रपूरकरांची नववर्ष सुरुवात आराध्य दैवत देवी महाकाली दर्शनाने झाली. नवीन वर्षी नव्या संकल्पासह देवीभक्त माता महाकाली चरणी दर्शनासाठी दाखल झाले. पुरातन देवी महाकाली मंदिरात भाविकानी पहाटेपासून गर्दी केली.

6 / 7
वर्ध्यात नववर्षानिमित्त साई मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली.  साई मंदिरात साकारली २५ बाय २५ फुटांची आकर्षक रांगोळी काढण्यात आली. साई मंदिरात आकर्षक सजावट करत विद्युत रोषणाई आकर्षक ठरतेय.

7 / 7
नवीन वर्षाचे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करत आसतो, नंदुरबार शहरात शालेय विद्यार्थ्यांनी हि नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केल आहे. नवीन वर्षाचे स्वागत सूर्य नमस्कार घालत विद्यार्थ्यांनी केल आहे. या विद्यालयाचा जवळ पास ८५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्कार घालत या वर्षाचे स्वागत केल आहे.