समीर चौघुले गेले, अशी बातमी आली अन्… स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा… नेमकं काय घडलं?

Sameer Choughule: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते समीर चौघुलेंनी धक्कादायक किस्सा सांगितला आहे. त्यांनी स्वत:च्या मृत्यूचीच बातमी एकदा नाही तर दोनदा ऐकली. त्यावर तो नेमकं काय म्हणाला वाचा...

| Updated on: Sep 23, 2025 | 1:00 PM
1 / 8
सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर समीर चौघुलेंनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या समीर चौघुले एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्यांनी स्वत: दोन वेळा स्वत:च्याच निधनाची बातमी वाचली होती. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

2 / 8
समीर चौघुले यांनी नुकताच MHJ unplugged या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी समीर चौघुलेंनी स्वत:च्या निधनाची बातमी दोनवेळा वाचली आहे असे सांगितले. तसेच नेमकं काय घडलं होतं हे देखील सांगितलं आहे.

3 / 8
एका सकाळी चुकून कोणीतरी बातमी टाकली की समीर चौघुले गेले... नेमकं काय घडलं होतं? असा प्रश्न त्यांना पॉडकास्टमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर समीर चौघुलेंनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

4 / 8
"हे एकदा नाही, दोनदा असे घडले आहे. एकदा पण एक अशीच बातमी पसरलेली... विजय चौघुले नावाचे, पुण्यातले रंगकर्मी, त्यांचे निधन झालेले. करोनामध्ये आपण 800 खिडक्या 900 दारं ही सीरियल करायचो... ती मालिका मी लिहायचो आणि त्यात कामही करायचो" असे समीर चौघुले म्हणाले.

5 / 8
पुढे त्यांनी सांगितले की, "तेव्हा आम्ही घरातून आपल्याच मोबाईलवर शूट करायचो... त्यामुळे मी शूट करत होतो आणि मोबाईल फ्लाइट मोडवर होता. ऑलरेडी आपल्या ग्रुपवर हे कोणीतरी टाकलेले आणि सगळीकडे पसरलेले..."

6 / 8
समीर चौघुले यांना यातले काहीच माहिती नव्हते. त्यांना फोन करुन सई ताम्हणकरने सांगितले. "ती मला फोन करत होती. फोनवर मला म्हणाली की, सम्या मला तुझा फक्त आवाज ऐकायचा होता... त्यानंतर तिनं मला सगळं सांगितलं" असे समीर म्हणाले.

7 / 8
पुढे ते म्हणाले की, "मग त्या माणसाला मी सांगितलं आणि मग त्यानं ती पोस्ट काढली. पण, एखादी गोष्ट आपण कन्फर्म न करता सगळ्यात आधी मला टाकायचं आहे, हा जो आग्रह असतो. याच्यावर नंतर आपण स्किटही केलं होतं..."

8 / 8
दुसरा किस्सा सांगताना ते म्हणाले की, "छगन चौघुले नावाचे एक संगीतकार होते त्यांचं करोनामध्ये निधन झाले होते. सोनी मराठीच्या कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला होता. कोणीतरी त्यांच्या निधनानंतर छगन चौघुले यांना आदरांजली द्यायच्या ऐवजी समीर चौघुलेंचा फोटो वापरुन पोस्ट केली..."