मी गारच पडले होते.., इंटिमेट सीनबद्दल अक्षया गुरवचा मोठा खुलासा; आईने दिली अशी परवानगी

मराठमोळी अभिनेत्री अक्षया गुरवने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दलचा किस्सा सांगितला. तो सीन ऐकून मी गारच पडले होते, असं ती म्हणाली. अखेर याविषयी तिने आईचा सल्ला घेतला.

| Updated on: Sep 06, 2026 | 7:53 PM
1 / 6
मराठी अभिनेत्री अक्षया गुरव तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. मराठी मालिकांसोबतच तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अक्षयाने तिच्या एका चित्रपटाच्या अनुभवाबद्दल आणि ती भूमिका स्वीकारताना आईने दिलेल्या पाठिंब्याबद्दल खुलासा केला. या भूमिकेमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचंही तिने सांगितलं.

मराठी अभिनेत्री अक्षया गुरव तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. मराठी मालिकांसोबतच तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अक्षयाने तिच्या एका चित्रपटाच्या अनुभवाबद्दल आणि ती भूमिका स्वीकारताना आईने दिलेल्या पाठिंब्याबद्दल खुलासा केला. या भूमिकेमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचंही तिने सांगितलं.

2 / 6

अक्षयाने मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा तिला एका मोठ्या दिग्दर्शकाचा फोन आला आणि त्यांनी चित्रपटातील इंटिमेट सीन समजावून सांगितला, तेव्हा ती काहीशी गारच पडली होती. तिच्यासमोर एक चांगली संधी आली होती आणि त्याच वेळी भूमिका आणि सीनबद्दल विचार करताना तिला आईचा सल्ला घ्यावासा वाटला.

3 / 6

“मी माझ्या आईला विचारलं होतं. मला जेव्हा सरांचा फोन आला तेव्हा त्यांनी सीन समजावून सांगितला. ते ऐकूनच मी गार पडले होते. म्हटलं आई शप्पथ.. आता एवढ्या मोठ्या डायरेक्टरला मी नाही कसं म्हणू? मला काम तर करायचं आहे. चांगली संधी चालून आली आहे,” असं अक्षयाने सांगितलं.

4 / 6

यानंतर तिने आईला थेट विचारलं की, “मी काय करू, तूच सांग.” त्यावर आईनेही तिच्यावर कोणताही दबाव न आणता आधी तिची इच्छा आणि कम्फर्ट विचारला. “तुझ्या फिल्मला हवंय ना. तू कम्फर्टेबल आहेस का?” असा प्रश्न आईने विचारल्याचं अक्षयाने सांगितलं.

5 / 6

आपण कम्फर्टेबल असल्याचं सांगितल्यानंतर आईनेही हिरवा कंदील दिला. त्यानंतर अक्षयाने ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला. “तुला ओके असेल तर हरकत नाही,” असं आईने सांगितल्यानंतर आपल्याला आत्मविश्वास आल्याचं अक्षया म्हणाली. त्यानंतर तिच्या मनात एकच विचार होता—“ओके बॉस.. डन. आपण ही फिल्म करतोय. बाकी सगळं गेलं तेल लावत. आपण हे काम करूयात.”

6 / 6

या चित्रपटाने आणि भूमिकेने अक्षयाला अभिनयाच्या दृष्टीने खूप काही शिकवलं. तसंच, या प्रोजेक्टच्या निमित्ताने तिला अनेक चांगल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शरद केळकर, संतोष जुवेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही तिने शेअर केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us