किती क्यूट दिसतेय, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण? जिच्या साडीमधील फोटोंनी सर्वांनाच लावलं वेड

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा प्रभूच्या नवीन लुकने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ. सौंदर्य पाहून चाहते करत आहेत कौतुक.

| Updated on: Sep 03, 2026 | 5:18 PM
1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘गौरी’ या भूमिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली आणि अल्पावधीतच तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘गौरी’ या भूमिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली आणि अल्पावधीतच तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

2 / 5

गिरीजाने साकारलेली ‘गौरी’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. तिच्या अभिनयामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. अभिनयासोबतच गिरीजा सोशल मीडियावरही सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

3 / 5

सध्या गिरीजाच्या साडीतील मोहक लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये तिने लाल काठ असलेली सुंदर साडी नेसली आहे. पारंपरिक साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

4 / 5

या लूकला उठावदार बनवण्यासाठी गिरीजाने आकर्षक मेकअप आणि नीटनेटकी हेअरस्टाईल केली आहे. विशेष म्हणजे, तिने केसांमध्ये गुलाबाचं फूल लावल्याने तिचा लूक अधिकच आकर्षित दिसत आहे.

5 / 5

दरम्यान, गिरीजा प्रभू आता हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दंगल टीव्हीवरील ‘तीस के पार जब मिला प्यार’ या नव्या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us