
नक्की तांबोळीने दुबईत बॉयफ्रेंड अरबाज पटेलसोबत बर्थ डे साजरा केला. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बर्थ डे चे फोटो पोस्ट केलेत. यात निक्की अरबाजसोबत रोमँटिक होताना दिसली. पुलच्या किनारी दोघांनी क्वालिटी टाइम घालवला. ग्रीन कलरच्या प्रिंटेड बिकिनीमध्ये निक्की दिसली.

अरबाज शर्टलेस पोज देताना दिसला. कपलची इंटेंस केमिस्ट्री फोटोमध्ये पहायला मिळाली. दोघे सोबत पावर कपल वाटले. बर्थ डे सेलिब्रेशनच्या या फोटोंवरुन निक्की ट्रोल होतेय. यूजर्सच म्हणणं आहे की, हे फोटो पाहून हनीमून वाइब्स येत आहेत.

हेटर्सनी निक्कीला इतके बोल्ड फोटो टाकल्याबद्दल खूप ट्रोल केलय. बिकिनीमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक होण्यावर लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलय की, माहित नाही दुबईमध्ये कोणतं सेलिब्रेशन चाललय. यूजर्सच्या या हेट कमेंट्सवर निक्कीने रोखठोक उत्तर दिलं. इन्स्टा स्टोरीवर निक्कीने व्हिडिओ शेअर केलाय.

ती म्हणते, "लोक मला भरपूर ज्ञान देतायत. माझ्या पोजवर कमेंट करतायत. इथल्या-तिथल्या गोष्टी बोलतायत. प्लीज तुम्ही हे ज्ञान फुकटात देत असाल, तर देऊ नका. मला यामध्ये इंटरेस्ट नाही. तुमच्या आयुष्यात काही चांगलं करा, थँक्यू"

मराठी बिगबॉसच्या पाचव्या सीजनमध्ये निक्की आणि अरबाज प्रेमात पडले. शो नंतरही दोघे परस्परांसोबत आहेत. बिग बॉसचा पाचवा सीजन दोघांनी गाजवलेला.