
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर अनेकजण विविध पोस्ट शेअर करत असतात. यात इन्फ्लुएंसरची संख्या जास्त आहे. मराठी इन्फ्लुएंसर्स यात उठून दिसतात.

अशीच एक मराठी इन्फ्लुएंसर म्हणजे अंकिता प्रभू वालावलकर... अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियावर अंकिता वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे व्हीडिओ इन्स्टाग्रामवर ट्रेंड होतात. तर तिचे फोटोही चाहत्यांना भावतात.

अंकिताचं यूट्यूब चॅनेलही आहे. अंकिता अस्सल मालवणी भाषेत व्हीडिओ करते. तिच्या कोकणी बोलीतील व्हीडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते.

'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने अंकिताला ओळखलं जातं. इन्स्टाग्रामवर तिचं याच नावाने अकाऊंट आहे. पाच लाखांहून अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.