
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. मात्र तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

'माझा होशील ना'या मालिकेतून गौतमी घराघरात पोहोचली. मालिकेत सई आणि आदित्यची लव्हस्टोरी अधिकच फुलत आहे.

एका लग्नाचं निमित्त पुढे करत गौतमीनं ही सुंदर साडी परिधान केली आहे. तिनं हे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गौतमी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती सेटवरील गमती-जमती सोशल मीडियावर शेअर करत असते.

निळ्या रंगाच्या या साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे. गौतमीनं तिच्या खास दादा लोकांसोबतही फोटोशूट केलं. अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि भूषण प्रधानसुध्दा या लग्नाला उपस्थित होते.