
सार्वजनिक ठिकाणी सोबत न चालणे - अनेक पुरूष सार्वजनिक ठिकाणी आपल्या पत्नीसोबत चालत नाहीत. यामुळे ती एकटी पडते. हे एखदम साधे कारण असले तरी याचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो.

कपड्यांबाबत वारंवार बोलणे - अनेकजण कपडे घालण्यावरून पत्नीला सतत बोलत असतात, काही लोक कपडे घालण्याबाबत महिलांवर बंधने घालतात, त्यामुळे तुमची पत्नी नाराज होऊ शकते. ही चूक टाळा.

इतरांसमोर जास्त विनोद करणे - अनेकदा पुरूष मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत विनोद करत असतात. मात्र ही बाब अनेकदा महिलांना खटकते. त्यामुळे जास्त विनोद करणे टाळावे.

वेळ न देणे - काही लोक कामाच्या व्यापामुळे पत्नीला वेळ देत नाहीत, याचा नात्यावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला वेळ द्या, यामुळे नात्यातील मधुरता कायम राहते.

तिच्या कुटुंबाचा आदर न करणे - अनेकांना वाटते ती पत्नीने आईवडिलांचा आदर करावा, मात्र ते पत्नीच्या पालकांचा आदर करत नाहीत. तुम्हीही असे करत असल्यास पत्नीला मानसिक त्रास होतो, त्यामुळे ही सवय बदला.