शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, या राज्यात हवामान विभागाचा मोठा अलर्ट, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, पुढील 24 तासात..
भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. देशातील अनेक राज्यांसाठी पुढील काही तास अत्यंत महत्वाची आहेत. प्रशासन अलर्ट मोडवर असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. चक्रीवादळाचे मोठे संकट आहे.

देशभरातील हवामानात बदल होत आहे.त्यातच अकवान चक्रीवादळाचा धोका अनेक राज्यांना आहे. अकवान चक्रीवादळाची दिशा अचानक बदलली असून त्याचा प्रभाव अधिक दिसत आहे. अकवान चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टी भागाता धोका अधिक वाढला आहे.
पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड राज्यात पावसाचा मोठा इशारा जाहीर करण्यात आला. यादरम्यान अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 130 च्या स्पीडने धडकणार आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
अनेक राज्यात शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाडींना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. हे चक्रीवादळ अधिक तीव्र होताना दिसत आहे. नुकसानीची मोठी शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने 20 नोव्हेंबर पोजी 14 राज्यात पावसाचा अलर्ट दिला आहे. या राज्यात अतिमुसळधार पाऊस होईल. ओडिसात या चक्रीवादळाचा अधिक धोका आहे. 74 बचाव पथके सरकारकडून तयार करण्यात आली.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला होता. धो धो पाऊस होणार असल्याचे सांगितले गेले. पण या चक्रीवादळाची दिशा बदलली आहे. त्यामुळे राज्यात पाऊस होणार नाही. पण काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळेल.