Weather Update : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात धो धो पाऊस, 130 किमी वेगाने महासंकट, थेट चक्रीवादळ..

Weather Update : राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात धो धो पाऊस होण्याचा अंदाज आहे.

| Updated on: Nov 19, 2026 | 7:38 AM
1 / 5
चक्रीवादळाचा मोठा अलर्ट हवामान विभागाने दिला. त्यातच या चक्रिवादळाचा परिणाम राज्यामध्येही बघायला मिळेल. महाराष्ट्रापासून 811 किमी अंतरावर हे चक्रीवादळ धडकणार आहे. विदर्भासह राज्यातील काही भागात यादरम्यान पाऊस होईल.

चक्रीवादळाचा मोठा अलर्ट हवामान विभागाने दिला. त्यातच या चक्रिवादळाचा परिणाम राज्यामध्येही बघायला मिळेल. महाराष्ट्रापासून 811 किमी अंतरावर हे चक्रीवादळ धडकणार आहे. विदर्भासह राज्यातील काही भागात यादरम्यान पाऊस होईल.

2 / 5

अकवन चक्रीवादळ अत्यंत धोकादायक आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात हे धडकणार आहे. 130 किमीच्या वेगाने हे चक्रीवादळ धडकेल. पश्चिम बंगालमधील या चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागातून थंडी गायब झाली.

3 / 5

20 ते 21 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहिल. विदर्भातही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

4 / 5

राज्यात दुष्काळाचे मोठे संकट आहे. या चक्रीवादळामुळे थोड्यातरी प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात राज्यात थंडी वाढली होती. आता चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली.

5 / 5

या चक्रीवादळाचे परिणाम राज्यात दिसणार असून पाऊस होईल. आंध्र प्रदेश आणि ओडिसाला खरा धोका या चक्रीवादळाचा असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. काही भागात शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us