AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, सरकारचे टेन्शन वाढले, थेट सातारा, कोल्हापूर, सांगली..

सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठे आंदोलन पुकारले. मात्र, त्यांच्या या आंदोलनाला अपयश मिळाले. त्यातच आता पुन्हा सीजेपीकडून मोठी घोषणा करण्यात आली.

कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, सरकारचे टेन्शन वाढले, थेट सातारा, कोल्हापूर, सांगली..
Abhijeet Dipke
| Updated on: Nov 19, 2026 | 7:11 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आपला मोर्चा सरकारी शाळांकडे वळवला होता. देशभरातील अनेक शाळांची पाहणी करून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दिपके यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडून बॉन्डवर सह्या करून घेतल्या. ज्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखे आंदोलन उभे करू शकले नाहीत. जंतर मंतरवर परवानगी नसतानाही घुसल्याने आशुतोष रांका आणि सीजेपीच्या बड्या नेत्यांना थेट जेलमध्येही जावे लागले. त्यातच दिवाळीनंतर पुन्हा सक्रिय काम करणार असल्याचे सीजेपीने जाहीर केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात बोलत नाहीत. सोशल मीडियावर काही दिवस याबाबत पोस्टही शेअर केली नव्हती.

त्यातच आता पुन्हा सीजेपीने मोठा निर्णय घेतला. सीजेपीकडून महाराष्ट्रातील शाळांची पुन्हा एकदा झाडाझडती घेतली जाणार आहे. दिल्लीनंतर आता सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापुराकडे मोर्चा वळवला आहे. काही दिवसांपूर्वी हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेचा मुद्दा अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला होता. नाशिकमधीलही शाळांची पाहणी केली.

नीट आणि सीएसआरच्या मुद्द्यावरून देशभर केंद्र सरकारविरोधात वातावरण तापविल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आपला मोर्चा पुन्हा एकदा शाळांच्या झाडाझडती मोहिमेकडे वळविला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारी शाळांचे ‘स्कुल ठिक करो’ आंदोलन सुरूच राहील, असे म्हटले आहे. आता सीजेपीने महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरकडील शाळांकडे मोर्चा वळविला आहे.

त्याचबरोबर दिल्लीत 20 सरकारी आणि महापालिकेच्या शाळांच्या केलेल्या पाहणीचा सामाजिक लेखोजोखा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे आता राज्यसरकारचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील काही शाळांची पाहणी सीजेपीने केली. मात्र, यावेळी त्यांना रोषाचा सामना करावा लागला. काही ठिकाणीही सीजेपीच्या नेत्यांना मारहाण देखील झाली. आता राज्यातील शाळांकडे सीजेपीने मोर्चा वळवला. अनेक भागात जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. काही किलोमीटर पायी प्रवास करून विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण