AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Rashi Bhavishya : या 4 राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण; कोणाला मिळणार धनलाभ, तर कोणाला करिअरमध्ये संधी?

Horoscope Today Thursday 19 November 2026: ग्रहांच्या स्थितीनुसार 4 राशींसाठी आजचा दिवस आनंददायी ठरणार आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना लाभ मिळेल, तर कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे सविस्तर राशिभविष्य.

Today Rashi Bhavishya : या 4 राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण; कोणाला मिळणार धनलाभ, तर कोणाला करिअरमध्ये संधी?
Rashi Bhavishya
| Edited By: | Updated on: Nov 19, 2026 | 6:21 AM
Share

ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून ज्योतिषशास्त्रात दररोजचे राशिभविष्य ठरवले जाते. गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी काही राशींसाठी दिवस आनंददायी आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे, तर काहींना कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. गुरुवार हा भगवान विष्णूच्या पूजेसाठी विशेष मानला जातो.

या दिवशी विष्णूची पूजा केल्याने धन-धान्यात वाढ होते, अशी धार्मिक मान्यता आहे. जाणून घेऊया, मेष ते मीन या सर्व १२ राशींसाठी दिवस कसा असेल.

मेष

प्रेमसंबंध आणि कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला. ऑफिसमध्ये तुमच्या प्रामाणिकपणावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहील. नव्या जबाबदाऱ्यांमुळे दिवस व्यस्त जाईल.

वृषभ

कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्यावर भर द्या. आर्थिक अडचणींमुळे मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत मोठी चिंता करण्याची गरज नाही.

मिथुन

व्यावसायिक क्षेत्रात तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. पैशांशी संबंधित किरकोळ अडचणी त्रास देऊ शकतात. बाहेरचे आणि जंक फूड खाणे टाळा. प्रेमसंबंधांमध्ये संवाद आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे नाते अधिक घट्ट होईल.

कर्क

ऑफिसमध्ये मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करून चांगले परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. प्रेमाच्या बाबतीत नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जा.

सिंह

कामाच्या ठिकाणी स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील. आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेऊ शकाल. प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर करून नाते अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा.

कन्या

नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवा. कामाच्या ठिकाणी स्वतःची मेहनत सिद्ध करण्यासाठी नव्या जबाबदाऱ्या स्वीकारा. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहील.

तूळ

प्रेमसंबंधांमध्ये काही आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती आणि आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

नातेसंबंधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखता येईल.

धनु

प्रेमसंबंधांमध्ये कोणताही निर्णय घेताना समजूतदारपणा दाखवा. नोकरीशी संबंधित अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल.

मकर

कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांवर मात करून चांगले परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती तुमच्या बाजूने राहील. जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा. नात्यातील समस्या सोडवण्यावर भर द्या.

कुंभ

कामावर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहिल्याने जीवनशैली अधिक आरामदायी होऊ शकते. आरोग्य उत्तम राहिल.

मीन

प्रेम आणि नात्यांमध्ये आनंद टिकवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात; मात्र त्यावर मात करण्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण